प्राईम नेटवर्क : पाकिस्तान कंगाल झालाय, पाकिस्तानला भिकेचे डोहाळे लागलेत, तरी सुद्धा पाकिस्तानला आर्थिक विकासा पेक्षा दहशतवाद जास्त महत्वाचा वाटतो आहे, आणि सोबत दहशतवादाला ते आश्रयही देताना दिसतात, मात्र दहशतवादाला दिल्या जाणाऱ्या आश्रयाचे साईड इफेक्ट सुद्धा पाकिस्तान वर दिसू लागलेय.
पाकिस्तानला लागलेत भिकेचे डोहाळे
पाकिस्तानची आर्थिक स्थिती इतकी खराब आहे कि काही वर्षात, महिन्यांत पाकिस्तानमध्ये अराजकता माजू शकते, पाकिस्तानमध्ये सध्या, वीज हि फक्त दिव्यांसाठी वापरण्याचे आवाहन केलं जातंय, पाकिस्तानसाठी गॅस, वॉटर हिटर, टीव्ही, पंखे, फ्रिज, हि इलेक्ट्रिक उत्पादनं लग्जरी उत्पादनांत येतात, सध्या पाकिस्तानमध्ये गरम पाणी करण्यासाठी चुलीवर पातेल्यात पाणी गरम करण्याचं आवाहन केलं जात आहे. गॅस न वापरता चूल वापरण्यासाठी आवाहन केलं जातंय. पाकिस्तान खरोखर कंगाल होताना दिसतोय.
आम्ही एकवेळ उपाशी राहू, पण अण्वस्त्रे बनवू
पाकिस्तानने यावर पर्याय काढण्यासाठी त्यांचे सर्व सरकारी खर्च कमी करत महागड्या सरकारी गाड्यांचा लिलाव केला होता, मात्र तरी सुद्धा त्याचा विशेष परिणाम त्यांची अर्थव्यवस्था सावरायला झाली नाही. असं असून हि पाकिस्तानी नेते, आमची मुलं उपाशी राहिले तरी चालतील, पण आम्ही अण्वस्त्र आणि आयटम बॉम्ब बनवू, अशी भाषा वापरतात. मात्र तुम्हाला आश्चर्य वाटेल, पाकिस्तान मध्ये येणाऱ्या काही वर्षांमध्ये अराजकता माजण्याची स्थिती निर्माण होऊ शकते.
पाकिस्तानची आर्थिक स्थिती अधिकच खरोखर धोकादायक
दिवसें दिवस पाकिस्तानची आर्थिक स्थिती अधिकच धोकादायक होताना दिसत आहे, यावेळी सध्या 22 कोटी लोकसंख्येच्या पाकिस्तानवर वेगवेगळ्या देशां कडून आणि जागतिक वित्त संस्था यांचं मिळून तब्बल 30,000,000,000 रुपये म्हणजेच 30 हजार अरब रुपये कर्ज आहे. हे कर्ज इतकं मोठं आहे कि पाकिस्तानला वार्षिक व्याज देताना अक्षरश: नाकी नऊ आले आहेत, आणि या कर्जावर वार्षिक जवळपास 3 हजार अरब रुपये व्याज द्यावं लागत आहे. धक्का दायक गोष्ट म्हणजे टॅक्सच्या रूपात पाकिस्तानच्या तिजोरीत फक्त वर्षाला 1800 अरब रुपये जमा होत आहेत. त्यांना या पैशातून व्यवस्थित व्याज सुद्धा देता येत नाहीये. त्यामुळे नागरिकांना वीज, रस्ते, पाणी अशा मूलभूत सुविधा सुद्धा धड पुरवता येत नाहीये.
यांच्या मुळे पाकिस्तानवर आली हि वेळ
आपल्याकडे एक म्हण आहे, आमदनी अठन्नी आणि खर्चा रुपया. हि परिस्थिती सध्या पाकिस्तानवर आहे. पाकिस्तानवर हि परिस्थिती येण्याचं मोठं कारण म्हणजे, सर्वात मोठा सरकारी भ्रष्टाचार, नुकतेच पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना भ्रष्टाचार प्रकरणा मुळे तुरुंगात जावं लागलं, पाकिस्तानची आर्थिक स्थिती लपवताना या असल्या भ्रष्टाचारी नेत्यांनी, जागतिक वित्तीय संस्थां कडून मोठं मोठाली कर्जे घेतली. मात्र त्याचा वापर विकास कामात कमी आणि राजेशाही सरकारी खर्च, भ्रष्टाचार, कर्जाचे हप्ते फेडण्यात पैसे जाऊ लागले.
पाकिस्तानच्या कंगालीचा चीन घेतोय फायदा
चीनने आत्ता पर्यंत पाकिस्तानला कर्जाच्या स्वरूपात हजारो करोडो रुपये दिले आहेत, अर्थात या सर्व परिस्थिमुळे पाकिस्तान कर्जाची रक्कम फेडू शकणार नाहीये, नुकतेच पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीर मधील काही भाग चीनला रेल्वे रूळ टाकण्यासाठी दिला होता, अशाच प्रकारे पाकिस्तानला आपला जमिनी हक्क चीन सारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशाला विकावा लागू शकतो. भविष्यात चीनच्या अवाढव्य लोकसंख्येला जागेची कमतरता पडू शकते, याच मुळे चीन पाकिस्तानी जमिनीवर हक्क ग्रहण करताना दिसू लागलाय.
पुलवामा हल्ल्यातील मास्टर माईंडच्या मागे चीन उभा
पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील मास्टर माईंड मौलाना मसूद अझर, याने या हल्ल्याची जवाबदारी स्वकारलीये. त्यादृष्टीने
नुकतेच यूएनचा सभासद देश असलेल्या चीनने पुन्हा एकदा, पाकिस्तानी अतिरेकी अझर मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादी मध्ये टाकण्यास स्पष्ट नकार दिलाय, चीन प्रत्येक वेळी तांत्रिक कारण देऊन पाकिस्तानच्या या दहशतवादाला येनकेन प्रकारे पाठिंबा देत असतो, चीन पाकिस्तानची मदत करता करता पर्यायाने पाकिस्तान चीनचा गुलाम झाल्यास आश्चर्य वाटायला नको.
बातमी आवडल्यास मित्रां सोबत अधिकाधिक शेअर करा,
आमच्या बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी फेसबुक पेजला लाईक करायला आणि युट्युब वर सबस्क्राईब करायला विसरू नका.