चीनमध्ये कोरोना व्हायरस थैमान घालत असून सुमारे १३ शहरे पूर्णपणे बंद करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. सामनाच्या एका रिपोर्ट नुसार चीनच्या या शहरांमध्ये राहणाऱ्या तब्बल ६ कोटी लोकांना तेथून बाहेर जाता येणार नाही किंवा बाहेरच्या कुणाला आता जाऊ दिले जाणार नाही. दरम्यान या व्हायरसच्या थैमानात ३९ भारतीय विद्यार्थी अडकले आहेत.
सामनाने दिलेल्या रिपोर्ट नुसार १४ भारतीय विद्यार्थी चीनमधील यिचांग शहरात अडकले आहेत. वुहान शहरात २५ भारतीय विद्यार्थी आहेत. हे सर्व विद्यार्थी चीनमधील रुग्णालयांमध्ये इंटर्नशीप करत असल्याचे कळते. हे सर्व विद्यार्थी गुरुवारीच मायदेशी परतणार होते. मात्र ऐनवेळी लॉकडाऊनमुळे ते अडकून पडले आहेत. या व्हायरसमुळे चीनमध्ये इतकी वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे की यंदा दुतावासात राहणाऱ्या भारतीयांना स्वातंत्र्य दिवस साजरा करत येणार नाहीये.