Home आरोग्य जगातील पहिली कोरोना लस रशियामध्ये लाँच; आरोग्य मंत्रालयाकडून मान्यता प्राप्त!

जगातील पहिली कोरोना लस रशियामध्ये लाँच; आरोग्य मंत्रालयाकडून मान्यता प्राप्त!

0

दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात लस निर्मितीसाठी आटोकाट प्रयत्न चालू आहेत. अशातच रशियात तयार केलेल्या लशीला आरोग्य मंत्रालयाची मान्यता प्राप्त झाली आहे. त्यामुळे जगात पहिली vaccine लाँच करण्याचा मान रशियाने पटकावला आहे. रशिया वगळता इतर कुठल्याच देशातील लशीची अंतिम चाचणी अजून पूर्ण झालेली नाही. याशिवाय रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतीन यांच्या मुलीला देखील या vaccine चा डोस देण्यात आला आहे.

रशियन आरोग्य मंत्रालयाच्या गमलेया संशोधन संस्थेने या vaccine चा शोध लावला आहे असे मीडिया न्यूजवरून समजते. जर ही लस यशस्वी झाली तर ऑक्टोबर २०२० पासून देशभरात मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जाईल असे रशियाचे आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांनी सांगितले.