Home मनोरंजन प्रदर्शनानंतर 12 दिवसांनी तान्हाजी महाराष्ट्रात करमुक्त : अजय देवगणने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे...

प्रदर्शनानंतर 12 दिवसांनी तान्हाजी महाराष्ट्रात करमुक्त : अजय देवगणने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मानले आभार

0

‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ हा सिनेमा शेवटी महाराष्ट्रातही करमुक्त झाला आहे. लोकमतच्या एका रिपोर्ट नुसार बुधवारी अर्थात आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून तब्बल १२ दिवसांनी हा चित्रपट राज्यात करमुक्त झाला. दरम्यान आज अजय देवगणने आपल्या ट्विटर हँडल वरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले.

प्रथम हा सिनेमा उत्तर प्रदेश व हरियाणा सरकारने करमुक्त केला होता. ज्या शूरवीर तानाजीची ही कहाणी आहे तो महाराष्ट्राच्या मातीतील असूनही महाराष्ट्रात हा सिनेमा करमुक्त नव्हता. म्हणून हा सिनेमा महाराष्ट्रातही करमुक्त करण्यात यावा अशी मागणी राज्यभरातून करण्यात आली होती. आज अखेर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘तान्हाजी’ सिनेमा करमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती मिळत आहे.