Home मनोरंजन बॉलिवूड अभिनेता इरफान खानचं 54 व्या वर्षी निधन, नाही पचवू शकला आईच्या...

बॉलिवूड अभिनेता इरफान खानचं 54 व्या वर्षी निधन, नाही पचवू शकला आईच्या जाण्याचा धक्का

0
irfan-khan

बॉलिवूड अभिनेता इरफान खानचं 54 व्या वर्षी निधन झालं आहे. मंगळवारी अचानक झालेल्या आजारामुळे इरफानला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. इरफानची प्रकृती गंभीर होती तो आयसीयूमध्ये होता. कोलन इन्फेक्शनमुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. इरफान खानला 2 वर्षांपूर्वी मार्च 2018 मध्ये न्यूरो-एंडोक्राइन ट्यूमर होता. ज्यासाठी तो लंडन येथे उपचारासाठी गेला होता. इरफान खानच्या आईचं काही दिवसां पूर्वीच निधन झालं होतं, त्याच्या आईच्या निधनाचा धक्का अभिनेता इरफान खान पचवू शकला नाही, त्याला आपल्या आईचं अंत्य दर्शन सुद्धा घेता आलं नव्हतं.

इरफान खान यांच्या निधनावर त्यांच्या प्रवक्त्याचे निवेदन आले आहे. तो म्हणाला- इरफानने 2018 मध्ये कर्क रोगाशी झालेल्या त्याच्या लढाई बद्दल लिहिले आहे, माझा विश्वास आहे की त्याने आत्मसमर्पण केले आहे. आणि आपल्या मोठ्या डोळ्यांनी आणि चमकदार अभिव्यक्तीने मोठ्या पडद्यावर अभिनय करणारा अभिनेता आज आपल्यास सोडून गेलाय. या दिवशी आम्ही त्यांच्या मृत्यूची बातमी घेऊन आलो आहोत ही खेदाची बाब आहे. इरफान हा एक मजबूत आत्मा होता, जो शेवटपर्यंत लढा देत होता आणि त्याच्या जवळ आलेल्या कोणाला ही नेहमीच प्रेरित करत असे. 2018 मध्ये दुर्मिळ कर्क रोगाने ग्रस्त झाल्या नंतर, त्याने त्यासह आलेल्या अनेक लढाया लढल्या.

इरफान खान लंडनहून उपचार घेऊन परत आला आणि अंग्रेजी मेडीयम चित्रपटासाठी शूटिंग केली. लॉकडाऊनमुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला नाही. इरफान खान समवेत राधिका मदन आणि करीना कपूर देखील या चित्रपटात दिसले होते. हा चित्रपट त्याचा शेवटचा चित्रपट होईल, असा विचार हि कोणाच्या डोक्यात आला नसेल.

अलीकडेच इरफान खानची आई सईदा बेगम यांचे निधन झाले होते, लॉकडाऊनमुळे इरफान आईच्या शेवटच्या भेटीला इरफान पोहोचू शकला नव्हता, यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे आईची शेवटची झलक त्याला पाहावी लागली होती.