प्राईम नेटवर्क : जेष्ठ अभिनेते, सामाजिक कार्यकर्ते, आणि विचारवंत डॉक्टर श्रीराम लागू यांचं आज पुण्यात वृद्धपकाळाने निधन झाले. ९२ वर्षांच्या डॉ. लागुनीं दीनानाथ मंगेशकर रुग्णायालात अखेरचा श्वास घेतला, यावेळी डॉक्टरांनी डॉ. लागूनसाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांना यश मिळू शकलं नाही. श्रीराम लागू यांनी मराठी तसेच हिंदी सिनेमासृष्टीत मोठं योगदान दिल, त्यांनी रंगभूमी सुद्धा त्या काळात प्रचंड गाजवली. त्यांच्या उमेदीच्या काळात त्यांची नाटके खूप गाजली गेली.
१६ नोव्हेंबर १९२७ रोजी पुण्यात डॉ. श्रीराम लागू यांचा जन्म झाला. बीजी महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय येथे त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. महाविद्यालयातच यत्यंनी नाटकांत अभिनय करायला सुरुवात केली होती. त्यांनी १९५० दरम्यान कान, नाक, घसा यांच्या शल्यक्रियेचं प्रशिक्षण घेतलं, आणि १९६० दरम्यान पुणे, टांझानिया येथे वैद्यकीय व्यवसाय सुरु केला होता. मात्र रंगभूमीच्या प्रेमापोटी त्यांना हा व्यवसाय बंद करावा लागला, आणि पुन्हा पूर्णवेळ रंगमंचावर यावं लागलं, १९६९ नंतर त्यांनी आपल्या अभिनयाच्या प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. वसंत कानेटकर लिखित ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटका पासून त्यांनी सुरुवात केली. कुसुमाग्रजांच्या नटसम्राट या नाटकात त्यांनी अजरामर भूमिका केली.
डॉ. श्रीराम लागू यांचं नाटक ‘नटसम्राट’
डॉ. श्रीराम लागू यांचा गाजलेला मराठी सिनेमा ‘पिंजरा’