Home मनोरंजन ‘एअरटेल ४जी गर्ल’ साशी छेत्री रिलेशनशिपमुळे आली पुन्हा एकदा चर्चेत

‘एअरटेल ४जी गर्ल’ साशी छेत्री रिलेशनशिपमुळे आली पुन्हा एकदा चर्चेत

0

अभिनेत्री व मॉडेल साशी छेत्री जाहिरात क्षेत्रात आल्यानंतर तिचं आयुष्यच पालटलं. साशी मुळात डेहरादूनची असून शिक्षण आटोपल्यानंतर ती मुंबईत आली. २०१५ पासून ती एअरटेल साठी काम करू लागली व कालांतराने याच जाहिरातीतून तिला भक्कम लोकप्रियता मिळाली. कित्येक दिवस तिच्या चाहत्यांना तिचं नावही माहित नव्हतं. म्हणूनच तिला पुढे ‘एअरटेल 4जी गर्ल’ असं नाव मिळालं. सध्या ‘साशी छेत्री’ एका बॉलिवूड सेलिब्रेटी सोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होत आहे.

इंडिया टीव्हीच्या इंग्रजी रिपोर्ट नुसार, म्युझिक डिरेक्टर आणि सिंगर सचिन गुप्ता आणि अभिनेत्री व मॉडेल साशी छेत्री हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत अशी माहिती मिळत आहे. सचिन गुप्ताने मेरे डॅड की मारूती व टेबल नंबर २१ चित्रपटाला संगीत दिले होते व त्याच्या कामाचे देखील अनेक चाहते आहेत. या दोघांनी अद्याप ते रिलेशनशिप मध्ये असल्याची अधिकृत चर्चा केली नसली तरी सोशल मीडियावर हे दोघे एकत्र पाहायला मिळत आहेत.