Home मनोरंजन ऐश्वर्या रॉयच्या गायनाचा हा व्हिडीओ होत आहे व्हायरल…

ऐश्वर्या रॉयच्या गायनाचा हा व्हिडीओ होत आहे व्हायरल…

0

९० च्या दशकात प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनचे अजूनही बरेच चाहते आहेत. सोशल मीडियावरील तिच्या फोटो आणि व्हिडिओला तिचे चाहते कायम दाद देत असतात. एका मीडिया रिपोर्टनुसार ऐश्वर्याचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होतांना दिसत आहे. या व्हिडिओमुळे तिचे चाहते तसेच इतरही बरेच लोक तिचं कौतुक करत आहेत.

या व्हिडिओत ऐश्वर्या ‘मेरी साँसों में बसा हैं’ हे गाणं गातांना दिसत आहे. या व्हिडिओत ऐश्वर्यासोबत अभिनेता चंद्रचूड सिंग देखील दिसत आहे. १९९७ मध्ये रिलीज झालेल्या ‘और प्यार हो गया’ या ऐश्वर्याच्या चित्रपटातील ‘मेरी साँसों में बसा हैं’ हे गाणं ते दोघे गात आहेत. हे गाणे त्याकाळातही चांगलेच चालले होते व प्रेक्षकांना आवडलेही होते. या व्हिडिओवर चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दर्शवल्या आहेत. ‘ऐश्वर्या एक चांगली अभिनेत्री तर आहेच पण त्यासोबतच ती एक चांगली गायिका देखील आहे’ अशा शब्दांत चाहते तिचे कौतुक करीत आहेत.