बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमार कायमच सर्वांचा लाडका अभिनेता राहिला आहे. कारण तो एक चांगला अभिनेता तर आहेच सोबत त्याच्या निखळ व्यक्तीमत्वामुळे तो एक चांगला माणूसही आहे. आजतागायत त्याने शेतकऱ्यांपासून ते पूरग्रस्तांपर्यंत प्रत्येकाला वेळोवेळी मदत केली आहे. सामाजिक अडचणी सर्वांसमोर ठेवून त्या सोडवण्यासाठी केलेल्या टॉयलेट, पॅडमॅन सारख्या चित्रपटांमुळेही तो अनेकांचा लाडका आहे. अक्षयकुमारने नुकताच एक ट्विट केलं आहे आणि हे ट्विट सध्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरत आहे.
काल अक्षय त्याची मुलगी निताराला घेऊन मॉर्निंग वॉकला गेला असताना तो रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका झोपडीत गेला. त्यावेळी त्याने घरातल्या वृद्ध आजी आणि आजोबांना प्यायला पाणी मागितलं. त्या वृद्ध जोडप्याने त्यांना पाणी तर दिलंच पण त्याचबरोबर त्यांना गुळ आणि भाकरही खायला दिली. त्यांच्या पाहुणचाराने आणि घरात काहीही नसताना काहीतरी देण्याच्या प्रवृत्तीने अक्षय कुमार थक्क झाला आहे.
अक्षय कुमार आपल्या ट्विट मध्ये म्हणाला, “या अनुभवाने मी भारावून गेलो आहे. मला आणि मुलीला आयुष्यभराचा अनुभव मिळाला आणि खूप शिकायलाही मिळालं.” नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘हाऊसफुल 4’ चित्रपटातील आगळ्यावेगळ्या लुक आणि अभिनयामुळे अक्षय कुमार चर्चेचा विषय होता. आता या ट्विट मुळे चर्चेला उधाण आलं आहे.