Home मनोरंजन झुंड सिनेमाचं शुटिंग अर्धवट सोडून, मानधन परत करून निघून गेले होते अमिताभ...

झुंड सिनेमाचं शुटिंग अर्धवट सोडून, मानधन परत करून निघून गेले होते अमिताभ बच्चन; ‘या’ अभिनेत्याने काढली समजूत…

0

नागराज मंजुळेचा आगामी सिनेमा ‘झुंड’ नागपूरचे निवृत्त क्रीडाशिक्षक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच मोठा चर्चा विषय झाला. सुरुवातीला कॉपीराईट उल्लंघणाच्या आरोपात हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला. त्यानंतर अवेळी शूटिंग, सतत शूटिंगच्या तारखांमध्ये बदल होत होता यामुळे अमिताभ यांचे कामाचे शेड्युलही बिघडत होते. परिणामी ते मध्येच सिनेमा सोडून, मानधन परत करून निघून गेले होते. मात्र शेवटी अमीर खानने मध्यस्थी केल्याने अमिताभ बच्चन यांनी पुन्हा सिनेमासाठी होकार दिला.

लोकमतच्या रिपोर्ट नुसार ‘झुंड’ सिनेमात अमिताभ बच्चन झोपडपट्टीतील काही मुलांना फुटबॉल शिकवणाऱ्या सेवानिवृत्त क्रीडा शिक्षकाच्या अर्थात विजय बारसे यांच्या भूमिकेत पहायला मिळणार आहेत अशी माहिती मिळत आहे. अमीर खानने मध्यस्ती करून बच्चन यांची समजूत काढल्यानंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी बच्चन यांच्या वेळापत्रकात व्यत्यय ना आणता अवघ्या ४५ दिवसात शुटिंग संपवलं. अनेक अडचणींना तोंड देऊन सिनेमा पूर्ण झाला. हा चित्रपट सैराट प्रमाणेच जोरदार चालेल असा अंदाज सांगितला जात आहे.