
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अर्थात अमृता फडणवीस यांचं आणखी एक नवीन इंग्रजी गाणं नुकतंच व्हॅलेंटाईन्स डे निमित्त रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्याचा व्हिडिओ अमृता फडणवीस यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट केला असून नेटकरी या गण्यावरून अमृता यांना ट्रोल करीत आहेत.
सोशल मीडियावर हे गाणं सध्या व्हायरल होत असून अमृता फडणवीस यांनी व्हेंलटाईन डेच्या निमित्ताने हे गाण रेकॉर्ड केलं अशी माहिती मीडिया रिपोर्ट नुसार मिळत आहे. लोकप्रिय इंग्रजी गायक lionel Richie याने हे ओरिजनल सॉंग गायलेलं आहे. तेच गाणं अमृता फडणवीस यांनी आपल्या आवाजात गाऊन व्हॅलेंटाईन डे निमित्त रिलीज केलं.
आता नेटकरी अमृता यांना ट्रोल करीत असून त्यांची तुलना राणू मंडल शी केली जात आहे. तर कुणी ‘मला आता हे सहन नाही होत’ अशा प्रतिक्रिया देत आहेत.