Home मनोरंजन ….आणि अमोल पालेकरांची “छोटीसी बात” सरकारला खटकली !

….आणि अमोल पालेकरांची “छोटीसी बात” सरकारला खटकली !

0

प्राईम नेटवर्क : नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये चित्रकार प्रभाकर बर्वे यांच्या स्मृतिनिमित्त आयोजित “इन्साइड द एम्प्टी बॉक्स” या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी अमोल पालेकर म्हणाले, “स्थानिक कलाकारांच्या सल्लागार समितीने बनवलेला हा कदाचित शेवटचा कार्यक्रम असेल याची अनेकांना कल्पनाही नसेल. विशिष्ट विचारसरणीला प्रोत्साहन देणार्‍या सरकारी दलालांनी हा कार्यक्रम बनवलेला नाही. या संस्थेच्या मुंबई आणि बंगळुरमधील केंद्रातील सल्लागार समित्या १३ नोव्हेंबर २०१८ रोजीच बरखास्त करण्यात आल्या आहेत.” यावर एनजीएमच्या मुंबई केंद्राच्या संचालिका अनिता रूपावतरम यांनी आक्षेप घेतला.

अमोल पालेकर पुढे म्हणाले की, “माझ्या महितीनुसार स्थानिक कलाकारांच्या सल्लागार समित्या बरखास्त केल्याने आता कोणत्या कलाकाराचे प्रदर्शन आयोजित करायचे,कोणाचे नाही याचा निर्णय दिल्लीचे सांस्कृतिक मंत्रालय करणार आहे.” हा कार्यक्रम प्रभाकर बर्वे यांच्यावर आधारित आहे,कृपया त्यांच्याबद्दल बोला असे म्हणत आणखी एका महिला सदस्याने आक्षेप घेतला.

अनेकांनी पालेकरांच्या भाषणात सतत व्यत्यय आणला,आक्षेपही घेतला. पण ते आपले विचार मांडतच राहिले. ते पुढे असेही म्हणाले की,”कलेची अभिव्यक्ती आणि विविध कला पाहण्याचे पवित्र स्थळ असलेल्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट वर अशा मर्यादा म्हणजे मानवतेविरुद्ध सुरू असलेल्या युद्धाचे ताजे उदाहरणचं आहे.

अलीकडेच अभिनेत्री नयनतारा सहगल यांना मराठी साहित्य संमेलनात सहभागी होण्यापासून मनाई केली गेली, कारण सद्यस्थितिवर त्या बोलणार होत्या. या घटनेनंतर पालेकरांचे भाषण थांबवणे चर्चेत आले आहे. ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकरांची ही “छोटीसी बात” सरकार अधिकार्‍यांना मात्र मोठी वाटत आहे.