Home मनोरंजन घरात गांजा सापडल्यानंतर भारती सिंगने दिले गांजा सेवन करत असल्याची कबुली; एनसीबीने...

घरात गांजा सापडल्यानंतर भारती सिंगने दिले गांजा सेवन करत असल्याची कबुली; एनसीबीने केले अटक

0

प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग हिच्या घरावर आज २१ नोव्हेंबरला एनसीबी अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. त्यावेळी त्यांना ८६.५ ग्राम गांजा सापडला. त्यामुळे एनसीबीने भारती व तिचा पती हर्ष या दोघांची चार तास कसून चौकशी केली. चौकशी अखेरीस भारतीने गांजाचे सेवन करत असल्याची कबुली दिल्यामुळे एनसीबीने भारतीला अटक केले. तसेच हर्षला देखील त्यांनी ताब्यात घेतले.

बॉलिवूड ड्रग्स प्रकरणाची तपासणी सुरु असल्याने अंधेरी, लोखंडवाला, वर्सोवा या भागांमध्ये एनसीबी छापे टाकत आहे. काही दिवसांपूर्वी भारतीच्या घरी ड्रग्स असल्याचे एनसीबीला एका अटकेत असलेल्या ड्रग पेडलरकडून कळले होते. त्यामुळे त्यांनी भारतीच्या घरावर छापा टाकला व त्यात त्यांना गांजा सापडला. लोकमतच्या मीडिया न्यूजनुसार आतापर्यंत बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटीजची नावे ड्रग्स प्रकरणात आली आहेत. त्यामुळे एनसीबीमार्फत अजूनही बऱ्याच सेलिब्रिटीजची चौकशी सुरु आहे.