बिग बॉसच्या माध्यमातुन घराघरांत व मनामनात पोहचलेली सई लोकुर लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. ABP माझा रिपोर्ट नुसार बिग बॉसनंतर सईची सर्वत्र चर्चा असायची शिवाय ती सोशल मीडियावरही फार सक्रिय असते. अशात तिने एका पोस्टद्वारे आपण आपला जोडीदार निवडल्याबद्दल फॅन्स आणि नेटकर्यांना सांगितलं आहे.
सईने प्रथम अर्थात चार दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला ज्यात तिने आपल्या जोडीदाराचा चेहरा दाखवलेला नाही. या फोटोमध्ये दोघेही पाठमोरे उभे आहेत. त्यानंतर दोन दिवसांआधी सईने मेहंदीचा फोटो पोस्ट केला आणि काल तिने पुन्हा एक आपल्या जोडीदारासोबत पाठमोरा फोटो पोस्ट केला आहे.
मीडिया रिपोर्ट नुसार सई लोकुरने आता लग्न ठरवलं असून अनेकांचा अंदाज तिने चुकवलाय. तिचा हा आयुष्याचा जोडीदार तिने स्वतः निवडला आहे. यावरून हा प्रेमविवाह नसून अरेंज मॅरेज असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र तो कोण? तो काय करतो? हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
ABP माझाच्या रिपोर्ट नुसार साखरपुड्यानंतर याच वर्षात दोघांचं लग्न होईल. लॉकडाऊनमुळे केवळ जवळच्या नातलगांच्या उपस्थितीत लग्नसमारंभ पार पडेल.