Home मनोरंजन बिग बॉस मराठी फेम वीणा जगताप झळकणार ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत!

बिग बॉस मराठी फेम वीणा जगताप झळकणार ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत!

0

सोनी मराठीवर सध्या जोमाने सुरु असलेल्या माझी आई काळूबाई या मालिकेत ट्विस्ट आला आहे. ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेत ‘आर्या’ या मुख्य पात्राची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आता मालिकेत दिसणार नसून तिच्या जागी बिग बॉस मराठी फेम वीणा जगताप ही या भूमिकेत दिसणार आहे.

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिला या मालिकेसाठी चित्रीकरणाच्या वेळा जमत नसल्याने तिच्या जागी अभिनेत्री वीणा जगतापला ‘आर्याच्या’ भूमिकेसाठी घेण्यात आले आहे. बिग बॉस मराठी, राधा प्रेम रंगी रंगली अशा लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले असल्याने वीणा चा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. त्यामुळे या नव्या भूमिकेत तिला पाहण्यासाठी तिचे चाहते आतुर झाले आहेत.