Home मनोरंजन शिवाजी महाराजांची मोदींशी तर तान्हाजींची अमित शहांशी तुलना : व्हिडिओ व्हारल नेटकरी...

शिवाजी महाराजांची मोदींशी तर तान्हाजींची अमित शहांशी तुलना : व्हिडिओ व्हारल नेटकरी संतप्त

0

नुकताच प्रदर्शित झालेला अभिनेता अजय देवगणचा ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा ऐतिहासिकपट सध्या देशभरात चांगलाच गाजला आहे. सिनेमाने चांगलीच कमाई केली असून रसिकांनीही या सिनेमाला भरभरून दाद दिली आहे. एकीकडे ही बाब देशात महाराष्ट्राची मान उंचावते तर दुसरीकडे या सिनेमातील काही प्रसंगाला निवडणूक प्रचारासाठी मॉर्फिंग केलं आहे ज्यामुळे शिवभक्त पुन्हा संतप्त झाले आहेत. या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर मोदींचा तर तान्हाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर अमित शहा यांचा चेहरा लावण्यात आला असून शिवाजी महाराजांची मोदींशी व तानाजी मालूसरेंची अमित शहा यांच्याशी तुलना केल्याने वातावरण चांगलेच पेटले आहे. काय आहे या व्हिडिओत तुम्हीच पहा… व्हिडीओ खालील प्रमाणे..

पॉलिटिकल किडा या ट्विटर हँडलवरून ही चित्रफित टाकली गेली असून या हँडल विरोधात लोक चांगलेच तापले आहेत. लोकसत्ता व लोकमतच्या रिपोर्ट नुसार सध्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार चांगलाच जोरदार पेटला आहे. हा व्हिडीओ दिल्ली विधानसभेच्या निवडणूक प्रचाराचा एक स्टन्ट असून, शिवप्रेमी आक्रोश व्यक्त करीत आहेत, संतप्त नेटकरी या व्हिडीओवर सायबर सेलला टॅग करून या ट्विटर हँडलवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करीत आहेत.