Home मनोरंजन एका टिकटॉक व्हिडीओ मुळे दीपिका पुन्हा वादाच्या भोवऱ्यात: कंगनाने दिला माफी मागण्याचा...

एका टिकटॉक व्हिडीओ मुळे दीपिका पुन्हा वादाच्या भोवऱ्यात: कंगनाने दिला माफी मागण्याचा सल्ला

0

छपाकच्या प्रदर्शनानंतर हवा तसा प्रतिसाद न आल्याने दीपिका अजूनही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. छपाकची टीम सोशल मीडियाच्या विविध माध्यमांतून प्रमोशनचे वेगवेगळे फंडे लढवत आहे. याच दरम्यान दीपिका व टिकटॉक स्टार फाबीने एक व्हिडीओ तयार केला आहे. मात्र याच व्हिडीओ मुळे दीपिका पुन्हा एकदा अडचणीत सापडली आहे. छपाकचा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हा कंगनाने दीपिका व दिग्दर्शिका मेघना गुलजार यांचं भरभरून कौतुक केलं होत. मात्र आता या एका टिकटॉक व्हिडीओ नंतर कंगनाने दीपिकाला माफी मागण्याचा सल्ला दिला आहे. असं काय आहे या व्हिडीओत पहा… व्हिडीओ खालील प्रमाणे..

दीपिकाने या प्रमोशनल टिकटॉक व्हिडीओमध्ये फाबीला तिच्या आवडीच्या तीन चित्रपटांमधील लूक्स रिक्रिएट करण्याचं चॅलेंज दिलं ज्यात ‘छपाक’चा देखील समावेश होता. लोकमतच्या रिपोर्ट नुसार ‘छपाक’मधील दीपिकाचा लूक फाबीला रिक्रिएट करायचा हा प्रकार नेटकर्यांना आवडलेला नाही. त्याच बरोबर यावर कंगना म्हणाली की, “दीपिकाने केलेला हा टिकटॉक व्हिडीओ अत्यंत असंवेदनशील आहे. त्याकरिता तिने माफी मागायला हवी. माझी बहिण स्वतः अॅसिड हल्ल्याची पीडिता आहे व हा व्हिडीओ पाहून तिला देखील वाईट वाटलं. तिच्याप्रमाणे तिच्यासारख्या कित्येक पीडितांना त्रास झाला असेल, त्यामुळे दीपिकाने माफी मागायला हवी” असं कंगनाने म्हटलं. यावर दीपिकाची काय प्रतिक्रिया असेल हे आता वेळच संगेल.