Home खेळ स्पर्धा धोनीच्या मैदानातील एक्सिट नंतर लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर एंट्री!

धोनीच्या मैदानातील एक्सिट नंतर लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर एंट्री!

0

कॅप्टन कूल अर्थात क्रिकेट प्रेमींचा लाडका भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी लवकरच आपली एक वेब सिरीज घेऊन येत आहे. या सिरीजमध्ये त्याची पत्नी म्हणजेच साक्षी देखील आहे. दोघे मिळून ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेब सीरिज आणणार हे कळल्यावर याची जोरदार चर्चा चालू झाली आहे. २०१९ मध्ये धोनीने ‘Roar Of The Lion’ या डॉक्युमेंट्रीसह ‘धोनी एन्टरटेनमेंट’ या प्रोडक्शन कंपनीला सुरूवात केली. त्या डॉक्युमेंट्री नंतर आता ‘धोनी एन्टरटेनमेंट’ वेब सीरिजच्या तयारीत आहे.

लोकसत्ताच्या एका रिपोर्ट नुसार – ही वेब सीरिज एका पुस्तकावर आधारित असणार आहे, जे पुस्तक अद्याप प्रकाशित झालेलं नाही. सोबतच असही सांगितलं जातंय की, आयएएनएसशी बोलताना साक्षी धोनीनं या वेब सीरिजबद्दल सांगितले. आयएएनएसशी बोलताना साक्षी म्हणाली “मी माझ्या विचारांवर व क्रिएटिव्हीटीवर खूप लक्ष दिलं आहे. २०१९ मध्ये जेव्हा आम्ही ‘रोअर ऑफ द लायन’ ही डॉक्युमेंट्री तयार करत होतो, तेव्हाच ही मनोरंजन क्षेत्रात प्रवेश करण्याची योग्य संधी आहे असं वाटलं” मीडिया रिपोर्ट नुसार ही वेब सीरिज पौराणिक साय-फाय स्टोरी असेल, या प्रोडक्शन हाऊसचं काम साक्षीच पहाते व निर्णय ती धोनीच्या सल्ल्यानुसार व आपल्या टीमच्या सल्ल्याने घेते. आजवर धोनीने क्रिकेटचं मैदान तर चांगलंच गाजवलं पण आता तो काय जादू करेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.