Home मनोरंजन राणू मंडल एका महिला चाहतीवर क्षुल्लक कारणावरून चिडली; आता झपाट्याने ‘हा’ व्हिडीओ...

राणू मंडल एका महिला चाहतीवर क्षुल्लक कारणावरून चिडली; आता झपाट्याने ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल: राणूचे चाहते म्हणाले, “तिने असं करायला नको होतं”

0

राणू मंडल कोण आहे हे आता भारतात प्रत्येकाला माहीत आहे. बंगालच्या राणाघाट रेल्वे स्टेशवर गाणं म्हणून उदर निर्वाह करणारी राणू पाहता पाहता स्टार झाली. हिमेश रेशमियाने अगदी रातोरात तिचं आयुष्यच बदलून टाकलं. अर्थात यामागे तिची मेहनत आणि सुरेख आवाजही होता. मात्र याच राणूला आता स्टार झाल्यानंतर प्रसिद्धीचा गर्व झाला अशी चर्चा संबध भारतभर होत आहे आणि याचं महत्वाचं कारण म्हणजे तिचा नुकताच व्हायरल झालेला व्हिडीओ! परिणामी रातोरात स्टार झालेली राणू आता रातोरात परत रस्तावर येण्याचे चिन्ह दिसत आहे.

Don't touch me 😠 I'm celebrity now❗️

Publiée par Parvez Tapadar sur Dimanche 3 novembre 2019

असं म्हणतात की, दयनीय परिस्थितीतून वर आलेली व्यक्ती अथवा स्टार कधीही आपले जुने दिवस विसरत नाही; ती व्यक्ती कायम आपल्या चाहत्यांशी नरमाईने वागते; त्यांच्यावर भरभरून प्रेम करते. आता शाहरुख खानच पहा ना. जगातला सर्वात श्रीमंत अभिनेता असला तरी तो त्याचा गर्व करून आपल्या चाहत्यांना कधीच दुखावत नाही. राणू मंडल मात्र याला अपवाद ठरली आहे. प्रसिद्धी आणि पैशाच्या झगमगाटात ती पार बुडून गेली आहे. स्टार झाल्यानंतर तिचा चाहत्यांशी बोलण्याचा ‘सूर’ बदलला आहे. राणू मंडल मीडिया समोर येते तेव्हा नम्रपणे बोलते. पण अशातच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एक व्हिडीओमध्ये उलट चित्र पाहायला मिळत आहे. या व्हिडिओत राणू एका चाहतीवर केवळ हात लावला म्हणून भडकलेली दिसते. परिणामी स्टार झाल्यावर राणू मंडल यांचा नूर बदलला अशी चर्चा प्रसार माध्यमांवर आणि सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

रानऊच्या या वागणुकीमुळे राणूचे फॅन्स नाराज झालेले दिसत आहेत आणि तेच चाहते आता तिच्या जुन्या दिवसांची तिला आठवण करून देत आहेत. काही लोक तर मार्मिक वाक्प्रचाराच्या माध्यमातून राणूला टोचणी देत आहेत. आतापर्यत सुमारे २५ लाख लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे तर लाखो लोकांनी व्हिडीओ पाहून राणूवर संताप व्यक्त केला. अजूनही हा व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होतोय.