
“आगामी IIFA अवॉर्ड मध्ये सिने कलाकारांना कडकनाथ कोंबड्यांची मेजवानी द्या” अशी सर्वांगीण मागणी सद्या मध्यप्रदेश मध्ये सुरू आहे. त्यासाठी झाबुआच्या कृषी विज्ञान केंद्रातील कडकनाथ अनुसंधान आणि उत्पादन योजनेच्या संचालकांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांना पत्र लिहिले आहे. कडकनाथ कोंबडा ही आदिवासी भागातील सुप्रसिद्ध मेजवानी आहे. यांच्या म्हणण्यानुसार जर कडकनाथ कोंबडा सिने कलाकारांना खाऊ घातला तर त्याला आंतरराष्ट्रीय महत्व व ओळख मिळेल तसेच आदिवासींना रोजगार सुद्धा मिळेल. ही मागणी करण्यामागचे कारण म्हणजे यावर्षी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी हा IIFA सोहळा आदिवासींना समर्पित केला आहे. कडकनाथ कोंबड्यांचं वैशिष्ट्य म्हणजे या मांसात मोठ्या प्रमाणात लोह समाविष्ट असते याबरोबरच फॅट ची मात्रा अत्यल्प असते.
पर्यटनमंत्री सुरेंद्रसिंह बघेल यांनीही कृषी विज्ञान केंद्राच्या कोंबडीच्या मेजवानीचं समर्थन केलंय. “आदिवीसींच्या कला, संस्कृती आणि खानपान पदार्थांचेही या सोहळ्यातून ब्रँडींग व्हावे. कारण, मुख्यमंत्र्यांनी हा सोहळा आदिवासींना समर्पित केला आहे. त्यामुळे आम्ही यासाठी नक्कीच प्रयत्नशील असू” असेही बघेल यांनी म्हटलंय.