Home मनोरंजन अखेर रियाने केला तिच्या नावावर असलेल्या २ फ्लॅट्स चा खुलासा!

अखेर रियाने केला तिच्या नावावर असलेल्या २ फ्लॅट्स चा खुलासा!

0

सुशांत सिंह राजपूत च्या आत्महत्येप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत असून रोज वेगळ्या व्यक्तींना भेटून तपास घेणे चालू आहे. ईडीने रिया चक्रवर्ती वर सुशांतच्या कमाईतून 2 फ्लॅट्स घेतल्याचा आरोप केला होता.

त्यामुळे काल (७ ऑगस्ट रोजी) रियाची ७ तास कसून चौकशी करण्यात आली असून तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. आपण मिळवलेली सर्व संपत्ती ही स्वतःच्या कमाईची आहे असा दावा तिने केला आहे.

तसेच ते दोन फ्लॅट्स देखील तिच्या कमाईचे आहेत असे तिने चौकशी दरम्यान सांगितले. रियाच्या नावावर खार आणि नवी मुंबई येथील उच्चभ्रू वस्तीमधील दोन फ्लॅट आहेत. रियाने एक फ्लॅट २०१२ मध्ये घेतला असून त्याची किंमत ६० लाख रुपये इतकी आहे. तसेच खारमधील घराची किंमत जवळपास ८५ लाख आहे असे तिने सांगितले. खारमधील घरासाठी रियाने 25 लाखांचं डाऊनपेमेंट केलं होतं. तर ६० गृहकर्ज घेतलं आहे.