
काल अर्थात ९ डिसेंबर रोजी दिपीकाचा आगामी चित्रपट ‘छपाक’चा ट्रेलर रिलीज झाला. चित्रपटाचा ट्रेलर पाहून अनेकांचे मन सुन्न झाले. २००५ मध्ये लक्ष्मी अग्रवाल हिच्यावर झालेल्या ऍसिड अटॅक आणि न्यासाठी झालेली तिची फरफट यावर आधारित हा सिनेमा आहे, चित्रपटाचा ट्रेलर क्षणभर थक्क करून सोडतो.
यापूर्वी जेव्हा चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं होतं तेव्हा प्रक्षकांनाही मुख्य भूमिकेत दीपीका असल्याची खात्री पटत नव्हती मात्र आता ट्रेलरने सर्व कोडे उलगडले आहे. छपाक’चा ट्रेलर जवळपास ५ लाख लोकांनी पहिला असून दिपकाचे चाहते तिचं भरभरून कौतुक करीत आहेत.
लक्ष्मी अग्रवाल हिच्यावर झालेल्या हल्यानंतर तिने मोठ्या धिटाईने कोर्टात केस लढली आणि तिच्या जिद्धीमुळे छोट्या-मोठ्या दुकानात अवैध केमिकल आणि ऍसिड विकणाऱ्या विक्रेत्यांविरोधात कठोर कायदा करण्यात आला. लक्ष्मीचा तो लढा संबंध भारतात चर्चेचा विषय ठरला होता आणि त्याच लढाईवर आधारित दीपिकाचा हा सिनेमा २०२० मध्ये जानेवारी महिन्यात १० तारखेला सिनेमा गृहात येत आहे.