
सध्या देशामध्ये कोरोनाचा प्रकोप सुरूच आहे. आम जनता असो की कलाकार सर्वच जणांना घरात बसण्याशिवाय काही एक मार्ग नाही. तरीसुद्धा काही लोक हा सल्ला गंभीरतेने घेत नाही आहेत, त्यामुळे कलाकार लोकांना घरातच राहण्याचा सल्ला देत आहेत. लोकांना ते वारंवार सोशल डिस्टेंसिंगचं महत्त्व सांगत आहेत. या संदर्भातच बॉलिवूड कलाकारांनी एक शॉर्ट फिल्म तयार केली आहे. याचं नाव आहे ‘फॅमिली’. खास बात अशी की, एकही स्टार या सिनेमासाठी घराच्या बाहेर पडला नाही. यात भरपूर मनोरंजनसुद्धा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या शॉर्ट फिल्मचं कौतुक केलं आहे.
बिग बी अमिताभ बच्चन, प्रियंका चोपडा, दिलजीत दोसांझ, रणबीर कपूर, आलिया भट, यांच्या सोबतच साऊथ स्टार रजनीकांत, चिरंजीवी, मामूथी सोबत इतरही कलाकार लोकांना या शॉर्टफिल्म च्या माध्यमातून स्ट्राँग मेसेज देताना दिसत आहेत.
पीएम मोदीही त्यांचे फॅन झालेले आहेत. हा सिनेमा पीएम मोदींनाही खूप आवडला आहे. त्यांनीही याचं कौतुक केलं आहे. “मोदींनी ट्विट केलं आहे की, तुम्ही दूर राहूनसुद्धा सोशल राहू शकता. एक खूप चांगला व्हिडीओ खूप चांगल्या मेसेजसोबत. तुम्हीही पहा.”
काय आहे या शॉर्ट फिल्मची कथा:
सुरुवातीला अमिताभजी काळा चष्मा शोधत असतात. नंतर दिलजीत दोसांझ झोपेत असलेल्या रणवीरला उठवतो. यानंतर एकेक करून सर्व लोक चष्मा शोधू लागतात. नंतर हा चष्मा आलिया भटकडे मिळतो. जो प्रियांका बिग बिना देते. अशी एकंदर कथा आहे.