
बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या कोरोना व्हायरसमुळे सेल्फ आयसोलेशनमध्ये घरीच आहेत. कोरोनामुळे सध्या सगळ्याच ठिकाणी सिनेमांच्या शूटींगला पूर्णपणे बंदी आहे आणि जवळपास अनेक शहरं लॉकडाऊन होत आहेत. अशातच या ब़ॉलीवूडकरांना त्यांच्या घरची कामं स्वतःच करावी लागत असल्याचं चित्र दिसतंय.यादरम्यान अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता कार्तिक आर्यनचे व्हिडिओ समोर आले आहेत.या व्हिडिओमध्ये दोन्ही कलाकार आपापल्या घरी भांडी घासताना दिसत आहेत.
कतरिनाने इंस्टाग्रामवर एक मिनी फिल्म पोस्ट केली जी किचममध्ये शूट केली गेली होती.ज्यामध्ये कतरिना भांडी घासताना दिसते,”आज या व्हिडिओत ती सांगतेय, कारण या सेल्फ आयसोलेशन दरम्यान घरातील कामं करण्याची देखील प्रॅक्टीस होतेय.बहीण इसाबेल आणि मी स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला आहे..मला असं वाटतं की मी यावर थोडं व्यावसायिक ट्युटोरिअल करेन!”
यानंतर कतरिना ने भांडी घासण्याचे वेगवेगळे प्रकार सांगितले, “मी आधीच असं ठरवून घेतलं होतं की, मला प्रत्येक भांडं एक एक करून स्वच्छ केलं पाहिजे का ? मग नंतर मी हे करण्याचा एक मस्त उपाय शोधला आहे. बेसीनमध्ये सगळी भांडी एकत्र घ्या, मग सगळी एकत्र घासून ठेवा आणि शेवटी मग सगळी भांडी एकत्र पाण्याखाली स्वच्छ धुवून काढा.ज्यामुळे पाणी देखील वाया जाणार नाही.