Home आरोग्य “किमान संध्याकाळी तरी दारूची दुकानं उघडी ठेवा, लोकांच्या डोक्याचा ताण कमी होईल”:...

“किमान संध्याकाळी तरी दारूची दुकानं उघडी ठेवा, लोकांच्या डोक्याचा ताण कमी होईल”: ऋषी कपूर

0

लॉकडाउन चा तिसराचं दिवस असून ह्या तीन दिवसांमध्ये असंख्य सेलिब्रिटी त्यांची मन ची बात ट्विटर वर बोलत आहेत. बॉलीवूड चे प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांनी तर चक्क दारू ची दुकाने उघडी ठेवण्याची मागणी केली आहे.

ऋषी कपूरनं एकापाठोपाठ एक ट्विट केले आहेत. आपल्या पहिल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “विचार करा जर सरकारनं सायंकाळी काही वेळासाठी दारूची दुकानं खुली करायलाच हवीत. मला चुकीचं समजू नका. माणसं घरातच आहेत आणि चहुबाजुला डिप्रेशन आणि अनिश्चितता सुद्धा आहे. पोलीस, डॉक्टर आणि नागरिकांना थोडा तरी दिलासा मिळण्याची गरज आहे.  

आणखी एका ट्विटमध्ये पुढे ऋषी कपूर म्हणतात, “ब्लॅकमध्ये तर विकली जात आहे,राज्य सरकारला या काळात एक्साईज ड्युटीद्वारे पैशांची खूप आवशकता आहे. फ्रस्ट्रेशनसोबत डिप्रेशन व्हायला नको. पित तर आहेत. कायदेशीर परवानगी द्या. वेडेपणा नसून हा माझा विचार आहे.”

ऋषी कपूर यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. अनेक नेटकरी यावर कमेंट करत आपलं मतही मांडताना दिसत आहे. अलीकडेच ऋषी यांनी ट्विट करत आणीबाणी जाहीर करण्याचीही मागणी केली होती.