Home खेळ स्पर्धा महेंद्रसिंग धोनी करतोय प्रेक्षकांची फसवणूक: भारतीय जाहिरात मानक परिषदेचा दावा

महेंद्रसिंग धोनी करतोय प्रेक्षकांची फसवणूक: भारतीय जाहिरात मानक परिषदेचा दावा

0

Cars 24 ही एक जुन्या गाड्यांची विक्री करणारी कंपनी आहे. या कंपनीच्या जाहिरातीतून दिशाभूल केली जात आहे असे नुकतेच समोर आले आहे. क्रिकेटप्रेमींचा लाडका माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा Cars 24 कंपनीची ही जाहिरात करतोय. न्यूज १८ लोकमतच्या रिपोर्ट नुसार भारतीय जाहिरात मानक परिषदेने दावा केला आहे की Cars 24 ही कंपनी धोनीने केलेल्या जाहिरातीतून प्रेक्षकांची फसवणूक करीत आहे. परिणामी या कंपनीत धोनीने गुंतवणूक केली असल्याने व तो या कंपनीचा ब्रॅन्ड अम्बॅसॅडर असल्याने त्याला याची शिक्षा देखील होऊ शकते.

Dhoni Review System – Get Instant Payment at CARS24

Want your payment faster than a speedy yorker? Why don't you take a review from the master reviewer- M.S Dhoni himself? #CARS24DRS #DhoniReviewSystem #CARS24 #InstantPaymentSell your car at – http://bit.ly/2ToJI54

Publiée par CARS24 sur Lundi 12 août 2019

या जाहिरातीत सांगितलं गेलं आहे की या कंपनीच्या माध्यमातून तुम्ही तुमची जुनी कार ताबडतोब विकू शकता व विकल्यानंतर लगेचच तिचे पैसे मिळवू शकता. मात्र जाहिरातीत सांगितल्या प्रमाणे ग्राहकांना तशी वागणूक मिळत नसून भारतीय जाहिरात मानक परिषदेने केलेल्या दाव्यानुसार २६४ ग्राहकांनी ही जाहिरात दिशाभूल करीत असल्याची तक्रार केल्याचं सांगितलं आहे. धोनी Cars 24 चा अम्बॅसॅडर असल्याने व गुंतवणूक केली असल्याने या जाहिरातीत काही ग्राहकांची फसवणूक करणारी चूक आढळल्यास त्यासाठी Cars 24 कंपनीच्या अधिकाऱ्यांसह धोनीलाही जबाबदार धरण्यात येईल असं सांगितलं जात आहे.