Home मनोरंजन मलायका अरोराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मलायका अरोराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

0


बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा हीच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. पण ‘वर्कआऊट फॅशन’ च्या नावाखाली मलायकाने नेमके कपडे घातलेत की नाही हेच नेटकऱ्यांना कळत नाही आहे!

या व्हीडिओमध्ये मलायकाने ‘स्कीन कलरचा’ जिमसूट परिधान केला आहे. तो रंग तिच्या शरीराच्या रंगाला इतका सारखा आहे की तिने कपडे घातले आहेत की नाही हे समजेनासे झाले आहे, त्यामुळे नेटकर्यांनी मलायकाला ट्रोल करायला सुरुवात केली.चर्चेत राहण्यासाठी मलायका वाट्टेल ते करू शकते असे काही नेटिझन्स चे म्हणणे आहे तर मलायका तुला ते कपडे अजिबात चांगले वाटत नाहीत अशी प्रतिक्रिया सुद्धा अनेक जणांनी दिली.

दरम्यान, सध्या मलायका ही ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या रिअ‌ॅलिटी शोची परीक्षक आहे.बघायला गेल्यास मलायका आपल्या हॉट फोटोंमुळं आणि योगामुळं नेहमीच चर्चेत असते. सोशलवर सक्रिय असणारी मलायका नेहमीच आपले बोल्ड फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. अशी हे सदैव चर्चित अभिनेत्री अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळेही खूप चर्चेत असते. हे दोघंही लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र काही दिवसांपूर्वी दिलेल्या एक मुलाखतीत या दोघांनी या केवळ अफवा असल्याचं स्पष्ट केलं होतं.