Home मनोरंजन ‘पर्यावरण संरक्षणासाठी मूल जन्माला घातले नाही’: अभिनेता अतुल कुलकर्णी

‘पर्यावरण संरक्षणासाठी मूल जन्माला घातले नाही’: अभिनेता अतुल कुलकर्णी

0

वाढत्या लोकसंख्येमुळे आणि शहरीकरणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. याचे पडसाद जगभरात उमटतांना दिसत आहेत. त्यामुळे लोकसंख्या आटोक्यात आणणे आवश्यक झाले आहे. लग्नानंतर बाळ झालंच पाहिजे असे समजले जाते. पण बाळ जन्माला आले म्हणजे वस्तूंचा वापर वाढतो आणि लोकसंख्येतही भर पडते. एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात यावर मत व्यक्त करतांना अभिनेते अतुल कुलकर्णी म्हणाले की, “मुल जन्माला घालणं थांबवायला पाहिजे. माझ्या लग्नाला २३ वर्षे झाली पण मी अजून मूल होऊ दिलं नाही. पर्यावरणाचे संरक्षण हाच केवळ त्यामागील हेतू आहे.”

‘ग्रेटाची हाक, तुम्हाला ऐकू येतेय ना….’ या अतुल देऊळगावकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात अतुल कुलकर्णी बोलत होते. मनोविकास प्रकाशन आयोजित या कार्यक्रमात ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकर, लेखक अतुल देऊळगावकर, अरविंद पाटकर, अभिनेता अतुल कुलकर्णी हे सर्व उपस्थित होते असे मीडिया न्यूजवरून समजले.

महाराष्ट्र टाईम्सच्या या संदर्भातील वृत्तानुसार लेखक अतुल देऊळगावकर म्हणाले, “बाहेर देशांत विद्यार्थ्यांना निसर्गाचे संगोपन कसे करावे हे शिकवले जाते. आपल्याकडेही पाठ्यपुस्तकांतून निसर्ग शिकवला पाहिजे. आता विज्ञान न शिकवता प्रत्यक्ष कृती करायला शिकवायला हवे.”