
महाराजांच्या निष्ठावान माळव्यांच्या रक्त सळसळून देणाऱ्या चित्रपटांचे दिग्दर्शक दिगपाल लांजेकर त्यांच्या “फर्जंद”, “फत्तेशीकस्त” यशस्वी चित्रपटानंतर “जंगजोहर” सिनेमा घेऊन आले आहेत. पावनखिंड लढवणार्या बाजीप्रभू देशपांडे आणि इतर मावळे यांच्या धाडसावर आधारित या चित्रपटाचा टीजर नुकताच रिलीज करण्यात आला.
शिवाजी महाराज जेव्हा पन्हाळगडावरून विशाळगडावर जायला निघतात तेव्हा दुश्मनाला रोखण्यासाठी पावनखिंड रोखून धरलेले आणि आपल्या राजेंसाठी धारातीर्थी पडलेले बाजीप्रभू देशपांडे सर्वाना परिचित आहेत, या महान लढवय्यावर चित्रपट येणार आहे म्हटल्यावर नेटिझन्स नि या चित्रपटाचे टिझर डोक्यावर उचलून घेतले असून, याचा सगळीकडे बोलबाला आहे.
“जंगजोहर” या भक्कम नावाबरोबर टिझर मध्ये असलेला ” हट्टाला पेटतो त्याला मराठा म्हणतात” या डायलॉगने अनेकांची मने जिंकली आहेत. चर्चित असा हा चित्रपट जून २०२१ पर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो असा प्राथमिक अंदाज आहे.