Home मनोरंजन सुशांत सारखीच माझी परिस्थिती, मी सुद्धा आत्महत्या करण्याच्या विचारात होतो: समीर सोनी

सुशांत सारखीच माझी परिस्थिती, मी सुद्धा आत्महत्या करण्याच्या विचारात होतो: समीर सोनी

0

सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्या प्रकरणाने अक्खा देश हादरून सोडला, त्याने आत्महत्या का केली याबाबत अनेक मत मतांतरे आहेत, मुख्य करून बॉलीवूड मधील नेपोटीसम यासाठी कारणीभूत आहे असे मानले जाते. अभिनेता समीर सोनीने सांगितले की सुशांत ची बातमी आली नाहीतर मी आत्महत्या केल्याची बातमी आली असती.

समीर सोनीने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले की, “सुशांतच्या मृत्यूवर मला सांगायचे आहे की मी स्वतः खूप अस्वस्थ आहे. मला माहित आहे, सुशांत नाही तर मी किंवा कोणी आणख्या एक अभिनेत्यानं आत्महत्या केली असती, सर्वांवर दबाव आहे. माझ्या २० वर्षांच्या कारकीर्दीत मला समजले आहे की देवाने प्रत्येकाला समान संधी दिल्या नाहीत. मग ते बॉलिवूड असो, राजकारण असो किंवा व्यवसाय असो. मी कोणालाही दोष देत नाही, अडचणींचा सामना करणं गरजेचं आहे”. समीर सोनीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याची सुसाइड नोट तर मिळाली नाही पण आता पोलिसांनी या केसबद्दल महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याची माहिती मिळत आहे. टाइम्स नाऊनं दिलेल्या वृत्तानुसार सुशांतच्या घरातून पोलिसांना त्याच्या ५ पर्सनल डायऱ्या सापडल्या आहेत. ज्यात लिहिलेल्या गोष्टींवरून त्याच्या आत्महत्येचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या डायरीमध्ये सुशांत वाचलेल्या पुस्तकांच्या महत्त्वाच्या नोट्स लिहित असे असा दावा एका मीडिया रिपोर्टमध्ये केला गेला आहे. त्यामुळे सुशांतच्या डायरीच्या हिशोबानं आता अनेक जवळच्या व्यक्तीची चौकशी होऊ शकते.