कृष्णा अभिषेक तुम्हाला ठाऊकच असेल.विविध कॉमेडी शो मधून लोकांच्या मनात घर करणारा आणि आपल्या अनोख्या शैलीमुळे रसिक प्रेक्षकांची मने जिंकणारा कृष्णा काही दिवसांपूर्वी लोकप्रिय कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’मध्ये एका भागामध्ये गायब होता.त्या दिवशी अभिनेते गोविंदा यांनी प्रमुख अतिथी म्हणून किंवा प्रमोशनसाठी कार्यक्रमाला भेट दिली होती.या भागात शोचा हुकुमी एक्का मानला जाणारा कॉमेडियन कृष्णा अभिषेक गायब असल्यामुळे अचानक तो कुठे गेला असा प्रश्न रसिक प्रेक्षकांना पडला होता.
मीडिया न्यूज नुसार याचं कारण मामा-भाच्यातलं वैर आहे असं सांगितलं जातंय.कृष्णाचे मामा गोविंदाबरोबरचे संबंध फारसे चांगले नाहीत.त्यामुळे त्यानं शोमध्ये गैरहजर राहणं पसंत केलं आहे असे मिळालेल्या माहितीवरून समजले.