
दिपिका आणि रणवीर म्हणजे बॉलिवूड चाहत्यांची आवडती जोडी! दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि कायम आपल्या अनोख्या व्यक्तीमत्वामुळे चर्चेत असतात. २०१० साली दीपिकाने प्रभादेवी येथे ब्लू मोंट इमारतीच्या २६ व्या फ्लोरवर ४ बी एच के फ्लॅट घेतला होता ज्याची किंमत होती तब्बल १६ कोटी रुपये! हा फ्लॅट घेतला तेव्हा चाहत्यांमध्ये दीपिकाच्या नावाची खूपच चर्चा झाली होती. आणि आता याच घराच्या कारणावरून रणवीर चर्चेचा विषय ठरला आहे.
झी न्यूजच्या एका रिपोर्ट नुसार रणवीरने देखील या इमारतीत फ्लॅट घेतला आहे. रणवीरने हा फ्लॅट विकत घेतला नसून किरायाने घेतला अशी माहिती मिळत आहे. मात्र चर्चा ही नाही तर या घराचं भाडं चर्चेचा विषय ठरत आहे. नोंदणी विभागाकडे असलेल्या माहितीनुसार रणवीरने दिपकाच्याच इमारतीत ३ वर्षांसाठी फ्लॅट भाड्याने घेतला असून त्याला पहिल्या दोन वर्षात सुमारे ७ लाख २५ हजार रुपये फ्लॅटचे भाडे भरावे लागणार आहेत तर शेवटच्या अर्थात तिसऱ्या वर्षात त्याला सुमारे ७ लाख ९७ हजार इतके भाडे भरावे लागेल अशी माहिती मिळत आहे.