
‘मोहंजदडो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी पूजा हेगडे दाक्षिणात्य चित्रपट ‘महर्षी’ने खूप नावारूपास आली व पुढेही तिने एकापेक्षा एक चित्रपट केले. याच पूजा हेगडेला भेटण्यासाठी एका चाहत्याने चक्क पाच दिवस फुटपाथवर झोपून काढले. या चाहत्याचे नाव भास्कर राव असून पूजाची एक झलक पाहण्यासाठी हा चक्क पाच दिवस तिच्या घराबाहेर वाट पाहत होता.
कुणीतरी आपल्याला भेटण्यासाठी पाच दिवस रस्त्यावर झोपलं हे पूजाला कळताच तिने ताबडतोब चाहत्याची अर्थात भास्कर रावची भेट घेतली व माफी देखील मागितली. पुजाने आपल्या चाहत्याची विचारपूस करून त्याच्याशी गप्पा मारल्या व शेवटी वाटचालीसाठी शुभेच्छा देत निरोप घेतला. पूजाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर भास्कर या चाहत्याच्या भेटीचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडिओ खालील प्रमाणे…