Home मनोरंजन शाहरुख खानच्या ‘कामयाब’ चित्रपटाचे सातासमुद्रापार कौतुक, विख्यात लेखक पाओलो कोएलो ची शाबासकी

शाहरुख खानच्या ‘कामयाब’ चित्रपटाचे सातासमुद्रापार कौतुक, विख्यात लेखक पाओलो कोएलो ची शाबासकी

0

‘द अलकेमिस्ट’ या जगविख्यात पुस्तकाचे लेखक पौलो कोहुलो यांनी शाहरुख खान होम प्रोडकॅशन च्या ‘कामियाब’ या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले.

या जगविख्यात लेखकांनी सदर सिनेमाचे पोस्टर ट्विट करत म्हटले, “पहिल्या प्रथम निर्मात्याचे शतशः आभार आणि कौतुक. मी अशाच एका चित्रपटाची निर्मिती करत आहे. २ दिवसांपूर्वी एका ब्राझील मधील सर्वश्रेष्ठ कलाकाराने आपल्याला मिळत असलेल्या वागणुकीमुळे आत्महत्या केली. हा चित्रपट ‘कॉमेडी’ म्हणून असला तरी यामध्ये खरेतर कलेची ‘ट्राजेडी(tragedy)’ दाखवली आहे”

दरम्यान शाहरूख खान या महान लेखकाचे त्याने निर्मित केलेल्या चित्रपटाबद्दलचे ट्विट वाचून अक्षरशः हतबद्ध झाला. त्याने ट्विट करत पौलो चे आभार व्यक्त केले आणि म्हटले की ही अतिशय दुर्दैवी बाब आहे की character actor हे नेहमी विसमरणात जातात. यासोबतच शाहरुख खान ने पौलो यांना स्वतःची काळजी घ्या आणि निरोगी राहा अश्या शुभेच्छा दिल्या.

‘कामयाब’ हा चित्रपट भारतीय सिनेमात असलेल्या charactor artist यांच्याभोवती फिरतो, या चित्रपटाची निर्मिती शाहरुख खानच्या रेड चिली प्रोड्युकॅशन आणि द्रिश्यम फिल्म्स ने केली आहे. या चित्रपटात संजय मिश्रा यांचा अतिशय महत्वाचा अभिनय आहे. हा चित्रपट भारतात ६ मार्च रोजी दिग्दर्शित झाला.