
शिवाजी महाराज आणि नरेंद्र मोदी यांची तुलना केल्याने ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाच्या प्रकाशनानं सबंध राज्यातून विरोध होत आहे. कालपासून अनेक शिवप्रेमींनी सोशल मिडियावरुन ‘आज के शिवाजी नेरेंद्र मोदी’ या मथळ्यावर आक्षेप व्यक्त केला आहे. ‘चला हवा येऊ द्या’ पत्र लिहिणारे सुप्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनीही फेसबुकवरुन आक्षेप नोंदवला विकत करत टीका केली आहे. अरविंद जगताप यांनी शेयर केलेली पोस्ट खालील प्रमाणे…
“राजकीय माकडं सत्ता बदलली की ईमान बदलतात. आपला राजा बदलतात. पण मावळ्यांचे राजे नेहमी एकच असतात. छत्रपती शिवाजी महाराज. आजपण, उद्यापण”
कधीपण’ असं अरविंद जगताप यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. केवळ अरविंद जगतापच नाही तर अनेक इतर सेलिब्रेटींही या मुद्यावर नाराजी व्यक्त केली व राज किय नेत्यांमध्ये तर सत्तात्ताने एक एकमेकांवर तोफ डागने चालूच आहे.