Home मनोरंजन आदीपुरुष सिनेमात अभिनेता प्रभास ‘ही’ मोठी भूमिका साकारणार!

आदीपुरुष सिनेमात अभिनेता प्रभास ‘ही’ मोठी भूमिका साकारणार!

0

दिग्दर्शक ओम राऊत याच्या ‘आदीपुरुष’ या आगामी सिनेमाचं पोस्टर रिलीज झाल्यापासून व या सिनेमात बाहुबली फेम साऊथ अभिनेता प्रभास असणार हे कळल्यापासून प्रेक्षकांना त्याबद्दल उत्सुकता लागून राहिली होती. बहुबलीची दमदार भूमिका निभावणार प्रभास या चित्रपटात कोणती भूमिका साकारणार याबद्दल त्याचे चाहते उत्सुक होते. दिग्दर्शक ओम राऊत यांनी त्याबद्दल आता खुलासा केला असून प्रभास ‘प्रभू श्रीरामांची’ भूमिका साकारणार असल्याचे सांगितले आहे.

मीडिया न्यूजनुसार ओम राऊत यांनी सांगितले की, भगवान रामांच्या भूमिकेसाठी केवळ प्रभासचाच चेहरा त्यांच्या डोळ्यांसमोर आला. प्रभास शांतता आणि आक्रमकता दोन्हीही आपल्या अभिनयातून पुरेपूर उतरवू शकतो. तसेच या भूमिकेसाठी प्रभास तिरंदाजी शिकायला सुरुवात करणार आहे. प्रभास रामाची भूमिका करणार हे कळल्यावर आता सीतेची आणि रावणाची भूमिका कोण साकारेल याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. २०२२ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल असे मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात येत आहे.