
लेखक, अभिनेता, दिग्दर्शक व निर्माते प्रवीण तरडेंच्या सध्या जोतदार ट्रोल होत आहेत. त्यांनी फेसबुकवरील केलेल्या एका कमेंटने मुळे त्याच्यावर ही वेळ ओढवली आहे. त्याच्या कॉमेंटमुळे नेटकरी संतापले असून सोशल मिडीयावर खळबळ उडाली आहे. त्याचं झालं असं की, पत्रकार राजू परुळेकर यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली होती ज्यात ते म्हणाले ‘एकतर तुम्ही देशासोबत आहात किंवा तुम्ही भाजपासोबत आहात, ठरवा’
राजू परुळेकर यांच्या या पोस्टवर प्रवीण तरडे यांनी ‘संपूर्ण देश भाजपसोबत आहे’ अशी भाजपला समर्थन देत कमेंट केली होती. त्याच्या या कमेंटवर नेटकरी इतके संतापले की पाहता पाहता प्रवीण तरडे सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागले. सकाळ माध्यमाच्या एका रिपोर्ट नुसार नेटकरी आणि काही भाजपविरोधी कार्यकर्त्यांनी प्रवीण तरडे यांना कॉल करून देखील ट्रोल केले. लोकांचा संताप पाहून प्रवीण यांनी त्यांची ही कमेंट डिलीट केली असून परिणामी आता ते जास्तच ट्रोल होत आहेत.

आता सगळीकडे या कॉमेंटचा स्क्रिन शॉट व्हायरल होतं आहे.