Home मनोरंजन अंबानींच्या होळीत ‘प्रियांका आणि निक’ झाले रंगात भिजून चिंब

अंबानींच्या होळीत ‘प्रियांका आणि निक’ झाले रंगात भिजून चिंब

0

सुपरस्टार प्रियंका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास नेहमीच चर्चेत असतात, हे दोघे नेमके होळीनिमित्त पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.सोशल मीडियावर या कपलचा एक व्हिडीओ खूपचं व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आहे तो मुकेश अंबानींच्या कुटुंबाने होळी सेलिब्रेशनचे आयोजन केले होते. यावेळी निक जोनास प्रियंका चोप्रासह या पार्टीत सहभागी झाले होते.

निकने भारतीय परंपरेनुसार रंग उधळत होळीचे सेलिब्रेशन केले. निकचे भारतीय परंपरेविषयीचे एवढे प्रेम पाहून सध्या त्याच्यावर खूप स्तुतीसुमने उधळली जात आहेत.नेटीझन्सना निकचा हा अंदाज प्रचंड पसंत पडला आहे. व्हिडीओ मध्ये निक प्रियंकाच्या ड्रेसला रंगाने रंगलेले हात पुसत असल्याचे दिसतंय. या विडिओला नेटकर्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. प्रियंका आणि निकमध्ये किती घट्ट बॉन्डींग आहे हे या व्हिडीओवरून स्पष्ट होते. या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव होत असून ”डोन्ट माईंड प्रियंका… बुरा नो मानो होली है…… ” अशा कमेंटस मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
प्रियांका आणि निक त्यांच्या वयातील अंतरामुळे नेहमीच ट्रोल होत असतात पण त्यांच्या क्युट कपलचे गोडवे सुद्धा अनेक जण वेळोनवेळी गात असतात.