सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा जोनास गेल्या २० वर्षांपासून कलाक्षेत्रात आहे. या कार्यकाळात तिने आपल्या अभिनयाने व सौंदर्याने अनेक चाहत्यांची मने जिंकली आहेत. अशा लोकप्रिय असलेल्या प्रियंका नुकतीच ब्रिटिश फॅशन काउन्सिलची ब्रँड अँबॅसेडर बनली आहे. त्यामुळे अभिनयानंतर ती फॅशन क्षेत्रातसुद्धा भरारी मारणार आहे. प्रियंकाने ब्रँड अँबॅसेडर बनल्याची माहिती ट्विट करून कळवली.
आपल्या ट्विटमध्ये ती म्हणाली की, “लंडनमध्ये राहत असतांना आणि काम करत असतांना मला ब्रिटिश फॅशन ची अँबॅसेडर फॉर पॉसिटीव्ह चेंज म्हणून गौरविण्यात आले आहे. आपण लवकर काही खास उपक्रम करू.” प्रियंका २००३ पासून बॉलिवूडमध्ये अभिनय व दिग्दर्शन करीत आहे. त्याआधी तिचा मिस वर्ल्ड म्हणून सन्मान करण्यात आला आहे. बॉलिवूडसोबत हॉलिवूडमध्ये देखील तिने काम केले असून ती कायमच प्रगतीपथावर टिकून राहिली आहे.