
पश्चिम बंगालमध्ये रेल्वे स्टेशनवर गाणे गाऊन भीक मागणाऱ्या रानू मंडलचा सुरेल आवाजात गातांनाचा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून हिमेश रेशमियाने तिला बॉलीवूडमध्ये गाण्याची संधी दिली. ही बातमी काही दिवसांपासून बरीच चर्चेत आहे. हिमेश रेशमियाच्या आगामी चित्रपटातील तीन गाण्यांसाठी रानूने आवाज दिला आहे हे ही आपण ऐकलेच असेल. या सर्वातून रानूला बरीच प्रसिद्धी मिळाली असून इतर बॉलीवूड स्टार्स देखील तिला ऑफर्स देऊ लागले आहेत. ड्रामा क्वीन राखी सावंतने अलीकडेच रानूला एका गाण्याची स्पेशल ऑफर दिली आहे.
राखी सावंतने बिग बॉस १३ च्या ओपनिंग शो मध्ये ‘छप्पन छुरी’ या आयटम सॉंगचे प्रमोशन केले. मंदाकिनी बोरा हिने हे मूळ गाणे गायले आहे. या गाण्याच्या रिमिक्स व्हर्जनसाठी रानूने आपला आवाज द्यावा अशी राखीची इच्छा आहे. त्यासाठी तिने रानू मंडलला विशेष ऑफरही दिली आहे.