Home मनोरंजन काही महिन्यांपूर्वीच गुपचूप लग्न करणारी राखी सावंत आता म्हणते ‘लग्न करू नका’...

काही महिन्यांपूर्वीच गुपचूप लग्न करणारी राखी सावंत आता म्हणते ‘लग्न करू नका’ : व्हिडीओ व्हायरल!

0

राखी सावंत कायमच काहीतरी अजब स्टंट करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते. मागील काही दिवसांपासून ती फार कुठे झळकली नाही पण आता पुन्हा एकदा तिने व्हिडीओ पोस्ट केले आहेत. त्यातील काही व्हिडीओ चर्चेला उधाण देत आहेत. राखणे आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम वरून काही व्हिडीओ पोस्ट केले आहेत ज्यात ती लग्नाला कंटाळलेली दिसत आहे. नुकताच 3-4 महिन्यांपूर्वी गुपचूप लग्न करणारी राखी आता ह्या व्हिडीओ मधून ‘लग्न करू नका’ असा संदेश देत आहे.

राखीने खरंच लग्न केलं की नाही याचा काहीही एक पुरावा नाही फक्त मीडिया रिपोर्ट नुसार 28 जुलै रोजी मुंबईच्या जेडब्ल्यू हॉटेलात तिने कुणालाही न सांगता, न कळवता गुपचूप लग्न केलं. तिचा पती कुठला आहे, कसा आहे याबद्दल कुणालाही काही माहिती मिळाली नसून केवळ त्याचं नाव ‘रितेश’ आहे अशी माहिती मिळत आहे. या व्यतिरित त्याच्या लग्नाचा साधा फोटो देखील कुणाला मिळालेला नाही. नक्की राखीने लग्न केलं की चर्चेत येणासाठी तिची ही नवी ट्रिक आहे यावरही अनेकांनी प्रश्न उभे केले होते.

आता नुकताच पोस्ट केलेल्या तिच्या व्हिडिओवर अनेक चाहते ‘इतक्या लवकर लग्नाला कंटाळली का?” अश्या प्रश्नांचा भडिमार करीत आहेत. यावर राखी नक्कीच काही उत्तर देणार नाही पण ती खरंच कंटाळली की उगाच काहीतरी चर्चेला विषय म्हणून हे व्हिडीओ केले हे कोडे अद्याप उलगडले नाही.