
आपल्या वक्तव्यांमुळे आणि पब्लिसिटी स्टंट्समुळे कायम चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत एका व्हिडिओमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने इंस्टाग्रामवर दोन व्हिडीओ पोस्ट केले आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये राखी विमानात बसलेली दिसत असून ती चीनमध्ये कोरोना व्हायरसचा खात्मा करण्यासाठी चालली आहे असे तिने सांगितले. तसेच दुसऱ्या व्हिडिओत कोरोना व्हायरसचा खात्मा करून भारतात परतले असे तिने सांगितले आहे. या दोन्ही व्हिडिओला लाखो लोकांनी बघितले अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
पहिल्या व्हिडिओत विमानात असतांना राखीने सोबत नासाचे सैनिक असल्याचे सांगितले. या व्हायरसला मारण्यासाठी नासाने विशेष औषधी तयार करून दिली आहे असेही तिने व्हिडिओतून सांगितले. तसेच दुसऱ्या व्हिडिओत तिने सांगितले की ती व्हायरसला मारून भारतात परतली आहे व भारतातील बलात्काऱ्यांना देण्यासाठी थोडा व्हायरस सोबतही घेऊन आली आहे. या दोन्ही व्हिडिओमुळे ती बरीच चर्चेत आली आहे व ट्रोलही होत आहे. राखीचे इन्स्टाग्राम वरील दोन्ही व्हिडीओ खालीलप्रमाणे…