Home मनोरंजन 67 व्या वर्षी ऋषी कपूर यांचं रुग्णालयात निधन, ऋषी यांच्या मृत्यू पूर्वीचा...

67 व्या वर्षी ऋषी कपूर यांचं रुग्णालयात निधन, ऋषी यांच्या मृत्यू पूर्वीचा घटनाक्रम

0
rishi kapoor

बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर यांचे आज गुरुवारी निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. अमिताभ बच्चन यांनी ट्विटद्वारे सर्वात आधी त्यांच्या मृत्यूबद्दल माहिती दिली. अमेरिकेत कर्क रोगाच्या उपचारा नंतर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारतात परतलेला अभिनेता ऋषी कपूर खराब प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या काही दिवसां पासून मुंबईच्या एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. ऋषी कपूरचा मोठा भाऊ रणधीर कपूर यांनी ही माहिती दिली.

हिंदी चित्रपट सृष्टीसाठी एप्रिल महिन्यातील शेवटचे दिवस अंधकारमय दिवस म्हणून आले आहेत. अभिनेता इरफान खानने बुधवारी या जगा पासून विश्रांती घेतली आणि गुरुवारी (बॉलिवूड) प्रसिद्ध अभिनेता ऋषी कपूरने ही कर्क रोगाच्या कारणास्तव मुंबईतील रुग्णालयात प्राण सोडले. गेल्या काही दिवसां पासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना मुंबईच्या एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल केले होते. येथे त्याची पत्नी नीतू त्यांच्या बरोबर होती.

हॉस्पिटलमधून मिळालेल्या माहिती नुसार, कर्क रोगाशी संबंधित समस्येमुळे ऋषी कपूर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे त्यांना आयसीयू मध्ये ठेवले गेले होते. त्याला पुन्हा पुन्हा व्हेंटिलेटरची देखील गरज होती.

ऋषी कपूर हॉस्पिटल मध्ये भरती झाल्याची बातमी चर्चेला आल्यापासून चाहते त्यांच्या तब्येती साठी प्रार्थना करत होते, पण या प्रार्थना चालल्या नाहीत. या वृत्तामुळे बॉलिवूडमध्ये शोकांतिका पसरलीये. याबद्दल अमिताभ बच्चन यांनी प्रथम ट्विट केले. अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करून लिहिले- तो गेला. ऋषी कपूर गेला. तो नुकताच मरण पावला. मी तुटलो आहे

यानंतर परेश रावल, अक्षय कुमार, रेणुका शहाणे असे अनेक कलाकार सोशल मीडियावर आपली व्यथा मांडत आहेत.

ऋषी कपूर कर्क रोगाचा उपचार घेत गेल्या वर्षी न्यूयॉर्क हून भारतात परत आले. ते एक उत्तम अभिनेता होते जे कर्करोगाच्या उपचारा दरम्यान देखील आपल्या कामाबद्दल चिंता व्यक्त करीत असे. याचा खुलासा त्यांचा मुलगा स्वतः रणबीर कपूर याने केला आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, रणबीरने एका पुरस्कार कार्यक्रमात सांगितले होते की न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरू असताना, तो बर्‍याचदा विचारत असे की बरे झाल्यावर त्यांना कोणी काही काम देईल का ? या पुढे मी काम करण्यास सक्षम असेल का ? ऋषी कपूर यांच्या जाण्याने बॉलीवूड मध्ये शोक कळा पसरलीय.