Home आरोग्य हॉस्पिटल मधून पळून गेलेल्या रुग्णांवर रितेश देशमुख भडकला

हॉस्पिटल मधून पळून गेलेल्या रुग्णांवर रितेश देशमुख भडकला

0

कोरोना व्हायरसची दहशत दिवसागणिक वाढत आहे. जगभरात १,५६,००० लोकांना याचा संसर्ग झाला आहे. तर ५,८०० हून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. संपूर्ण जगासह भारतालासुद्धा कोरोनाचा विळखा बसला आहे. देशात कोरोनाचे एकूण १२६ रुग्ण असल्याची पुष्टी आरोग्यमंत्रालयाने दिली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यातच कोरोना रुग्ण हॉस्पिटलमधून पळून गेल्याचे वृत्त समोर आल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेचा संपात नागरिकांबरोबच सेलिब्रेटींनाही अनावर झाला आणि रितेश देशमुख, बिपाशा बसू या सेलिब्रेटींनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

भारतात सुमारे २०० पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.तर त्यातील ११ जणांनी हॉस्पिटलमधून पलायन केल्याचे वृत्त समोर आले. या वृत्ताच्या व्हिडिओवर रिट्विट करत रितेश देशमुख याने लिहिले की, हा महाभयंकर बेजबाबदारपणा आहे. सरकार आणि डॉक्टरांना तुमची मदत करु द्या. एकांतात राहिल्याने तुमच्या मित्रमंडळी, आप्तेष्ट आणि अनोळखी लोकांना निर्माण होणारा धोका कमी होईल. त्याचबरोबर तुम्हाला योग्य उपचारही मिळतील. आपण सर्व सैनिक आहोत. आपण सर्वजण मिळून याचा नक्कीच सामना करु. 

यावर बिपाशा बसू म्हणते, “लोक इतके कसे बेजबाबदार आणि निष्काळजीपणे वागू शकतात. देशाचे नागरिक असल्याने आपण जागरुक असणे गरजेचे आहे. तसंच या परिस्थितीत आपली मदत करण्यासाठी सरकारला आपण पूर्णपणे मदत करायला हवी. हे खूप अचंबित करणारे आहे.”