Home मनोरंजन रिया चक्रवर्तीने सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले; सुशांत सिंग राजपुतच्या वडिलांचे गंभीर आरोप

रिया चक्रवर्तीने सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले; सुशांत सिंग राजपुतच्या वडिलांचे गंभीर आरोप

0

सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर अजूनही बॉलीवूड फारसे सावररलेलं नाही. मुंबई पोलिसांची या प्रकरणी तपासणी चालू असताना बराच वेळ होऊनही काहीही हाती न लागल्यामुळे सुशांतच्या वडिलांनी मुंबई पोलिसांवर विश्वास ठेवू शकत नाही असे सांगितले आहे. त्यामुळे सुशांत सिंग राजपूत च्या वडिलांनी बिहारच्या पाटण्यातील राजीवनगर येथे रिया चक्रवर्ती विरोधात एफ आय आर लिहुन तक्रार दाखल केली आहे असे लोकमत मीडिया न्यूजवरून समजले.

सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी रिया चक्रवर्ती वर गंभीर आरोप केले आहेत. तसेच सुशांत च्या डॉक्टरांनी हे ही सांगितले की अंकिता लोखंडेसोबतच्या ब्रेकअप आधी सुशांतच्या आयुष्यात सगळं काही ठीक होतं. तसेच ‘रिया चक्रवर्ती सोबतच तिच्या घरचेही म्हणजे संध्या चक्रवर्ती, इंद्रजीत चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती हे सगळे या प्रकरणासाठी जबाबदार असून त्यांनी सुशांत सोबत जवळीक करून त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले’ असे गंभीर आरोप सुशांतच्या वडिलांनी केले आहेत.

तसेच झी 24 तास च्या मीडिया न्यूजनुसार गेल्या वर्षी सुशांत च्या खात्यात १७ कोटी रुपये होते. त्यातील १५ कोटी हे त्याचा संबंध नसलेल्या खात्यात वळते झाले. रियाने जातांना सुशांतचा लॅपटॉप, रोख रक्कम, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड अशा सगळ्या वस्तू ती घेऊन गेली असाही आरोप त्याच्या वडिलांनी केला.