Home मनोरंजन लातुरचा रोहित राऊत ठरला ‘इंडियन आयडल’ 2020 चा रनरअप

लातुरचा रोहित राऊत ठरला ‘इंडियन आयडल’ 2020 चा रनरअप

0

इंडियन आयडलचा यावर्षीचा हा ११ वा अवतार पहिल्या वहिल्या सिजनजा विजेता ‘अभिजित सावंत’ तर प्रत्येकाच्या लक्षात असेलच. यावर्षी सुद्धा हा सोहळा फार दिमाखात पार पडला, उपांत्य फेरीत सर्व स्पर्धकांचे परफॉर्मन्स धमाकेदार होते. यावेळी स्पर्धकांचे पालक- नातेवाईक स्पर्धकांचा उत्साह वाढवायला आले होते. अखेर विजेत्याचं नाव जाहीर झालं आणि एकच जल्लोष झाला. इंडियन आयडॉल ११ चे विजेतेपद सनी हिंदुस्तानीने जिंकले.


सनीला इंडियन आयडलच्या ट्रॉफीबरोबर २५ लाख रूपयांचा धनादेश मिळाला. तर पहिल्या आणि दुसऱ्या रनरअपला प्रत्येकी ५ लाखांचा धनादेश देण्यात आला. पहिला रनरअप रोहित राऊत ठरला तर दुसरी रनरअप ओंकना मुखर्जी ठरली. तर अद्रिज घोष तिसरा आणि रिधम कल्याण चौथा रनरअप ठरला. यंदाचा सिजन कमालीचा लोकप्रिय ठरला. मराठमोळ्या रोहितने सर्वांची मने जिंकली. रोहित मूळचा लातुर शहरातील असून लातूर मध्येच त्याने शिक्षण घेतले आहे. रोहितची आई देवाघरी गेल्याने तो आणि त्याचे बाबा असा त्याचा परिवार आहे. त्याने विजेतेपद जिंकले नसले तरी प्रेक्षकांचे आणि समीक्षकांची मने जिंकून घेतली आहेत.

पहा रोहितचा फिनाले परफॉर्मन्स