Home मनोरंजन रोहित शेट्टीने पोलिसांसाठी सुरू केली ८ हॉटेल्स

रोहित शेट्टीने पोलिसांसाठी सुरू केली ८ हॉटेल्स

0

बॉलिवूडचा धडाकेबाज दिग्दर्शक रोहित शेट्टी याने कोरोना व्हायरसच्या संकटात जीवाची बाजी लावून मुंबईमध्ये रस्त्यावर ड्युटी करणार्‍या पोलिस मंडळीसाठी पुढे आला आहे. मुंबई पोलिसांच्या सेवेने रोहित शेट्टीने मुंबईमधील ८ विविध हॉटेल्स खुली करून दिली आहेत. सध्या कोरोना व्हायरस विरूद्धच्या युद्धात मुंबई पोलिस अग्रस्थानी उभे राहून लढत आहेत. दरम्यान मुंबईत झपाट्याने कोरोना व्हायरसचा फैलाव होत असल्याने आता पोलिसांना सुरक्षित ठेवण्यासाठी, त्यांना आराम, जेवणाची आणि इतर सोयी सुविधांसाठी ही हॉटेल्स सज्ज असतील. आज मुंबई पोलिसांनी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून याबाबत माहिती दिली आणि रोहित शेट्टीचे आभारदेखील मानले आहेत.

रोहित शेट्टी प्रमाणेच यापूर्वी सोनू सूद, शाहरूख खान यांनी कोरोना विरूद्धच्या लढाईमध्ये त्यांची ऑफिस, हॉटेल्स दिली होती. तर वरुण धवनने कोरोनाविरूद्धच्या लढाईतील योद्धांसाठी जेवणाची सोय केली आहे.

दिवसागणिक कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाबधित महाराष्ट्रात असून मुंबई शहर अग्रस्थानी आहे. धारावी, वरळी कोळीवाडा या भागामध्ये कोरोनाबाधित मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. त्यामुळे आता नागरिकांना घरातच राहण्याचं कळकळीचं आवाहन करण्यात येत आहे.