बॉलिवूडचा चहिता हिरो सलमान खान नेहमी काही ना काही चर्चेत असतो. त्याच्या मायाळू हृदयाचे अनेक किस्से आपण नेहमी बघत असतो. बीइंग ह्यूमन ह्या त्याच्या NGO ची कामे असो वा सलमान त्याच्याकडे मदत मागण्यासाठी आलेल्यासाठी करणारी कामे असो, तो एक दिलदार माणूस आहे हे नेहमीच त्याच्या कामगिरीतुन करून दाखवतो. आपल्या सलमान ने कोल्हापुरातील पुराखालील एक गाव दत्तक घेतले आहे.
मागच्या वर्षी अतिवृष्टी मुळे सातारा,सांगली व कोल्हापूर मधील अनेक गावांना पुराचा फटका बसला होता. सलमान ने कोल्हापुरातील असेच खिद्रापूर गाव दत्तक घेतले असून गावकऱ्यांच्या विकासाची जबाबदारी त्याने घेतली आहे. सलमान आणि एलान फौंडेशन च्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. गावातील घरांची पुनर्बांधणी होणार असून त्यासाठी विविध संस्था पैसे पुरवणार आहेत.
सलमान साठी ही काही नवी गोष्ट नाही याआधीही त्याने काश्मीर मधील एक गाव दत्तक घेतले होते त्याने २०१८ मध्ये २ करोड रुपये कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी दिले होते.