
‘
गणेश आचार्य जे आपल्या इशाऱ्यावर बॉलिवूड सिनेमांच्या अभिनेत्यांना नाचावायचे, ते आता चांगलेच वादाच्या भोवऱ्यात अडकलेले दिसत आहेत. न्यूज 18 लोकमतच्या एका रिपोर्ट नुसार सध्या त्यांचा नव्या आणि जुन्या संघटनेचा वाद सुरू असतांनाच आणखी एका खळबळजनक खुलाश्याने कोरिओग्राफर गणेश आचार्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गणेश आचार्य यांच्यावर एका महिला कोरिओग्राफरनं गंभीर आरोप केले आहेत. त्या महिला कोरिओग्राफर म्हणतात की, “गणेश आचार्य अडल्ट व्हिडीओ पाहण्यासाठी जबरदस्ती करतात.” असा आरोप गणेश आचार्य यांच्यावर करण्यात आला आहे अशी माहिती मिळत आहे.
या संदर्भात ANI ने एक ट्विट पोस्ट केलं होतं (ट्विट वरील प्रमाणे), ज्यातून माहिती मिळते की “मुंबईमधील एका ३३ वर्षीय महिला कोरिओग्राफरने इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन कोरिओग्राफर असोसिएशनचे महासचिव गणेश आचार्य यांच्या विरोधात राज्य महिला आयोग व अंबोली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे.” त्याचबरोबर या ट्विट मधून अशीही माहिती मिळते की, या महिलेनं तिच्या तक्रारीत म्हटलं आहे की, ‘गणेश आचार्य तिला इंडस्ट्रीमध्ये काम मिळू देत नाहीयेत. काम पाहिजे असेल तर कामाच्या बदल्यात तो कमिशन मागतो सोबतच जबरदस्तीनं अडल्ट व्हिडीओ पहायला लावतो.’ असं या महिला कोरिओग्राफरने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.