Home मनोरंजन एका फॅनने शाहरुख खानला दिली चंद्रावर प्रॉपर्टी : SRK बर्थडे स्पेशल…

एका फॅनने शाहरुख खानला दिली चंद्रावर प्रॉपर्टी : SRK बर्थडे स्पेशल…

0

किंगखान अर्थात शाहरुख खान जगातला दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत अभिनेता आहे ज्याने आपल्या अभिनयाने आणि अनोख्या शैलीने अनेक वर्षांपासून आजतागायत रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे. अशा बाजीगर नायकाचा आज वाढदिवस आहे आणि त्याच्या वाढदिवसा निमित्त हा विशेष वृत्तांत…

शाहरुख खानच्या आयुष्याच्या प्रवास एव्हाना साऱ्या भारताला कळला असेल. एक सर्वसामान्य कुटूंबातील मुलगा आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभिनय क्षेत्रात आला. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्याने स्वतःला घडवलं आणि दाखवून दिलं साऱ्या जगाला त्याचं अभिनयावरचं प्रेम! आज तो जगातला दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत अभिनेता आहे आणि महत्वाचं म्हणजे देश-विदेशात त्याचे लाखो फॅन्स आहेत जे त्याच्यासाठी काहीही करायला तयार असतात.

मीडिया न्यूज नुसार चंद्रावर शाहरुखची प्रॉपर्टी आहे. ऑस्ट्रेलियातील शाहरुखच्या एका चाहतीने ‘लुनार रिअल इस्टेट’वर बुकिंग करून दर वर्षी शाहरुखच्या नावानं चंद्रावर थोडीथोडी प्रॉपर्टी विकत घेतली आहे. शाहरुख ईमेलद्वारे या चाहतीच्या संपर्कात असतो. आपल्या लाडक्या स्टारसाठी कुणी चाहत्याने स्वखर्चाने चंद्रावर प्रॉपर्टी घ्यावे हे डोळे दिपून टाकणारं प्रेम आहे.

शाहरुखला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा व त्याला दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!